---Advertisement---
वाणिज्य

सोने-चांदीच्या किंमतीत पडझड ; खरेदीपूर्वी आजचा भाव तपासून घ्या..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२४ । गेल्या आठवड्यात सोन्याने मोठी उसळी घेतली तर चांदीने पण ग्राहकांना घामटा फोडला होता. किंमतींनी मोठी मजल मारल्यांनंतर दोन्ही धातूंना कमाल दाखवता आली नाही. गेल्या आठवड्यात सोन्यात 1500 रुपयांची तर चांदीत 2800 रुपयांची वाढ दिसून आली होती. या आठवड्याची सुरुवात अजून तरी दणक्यात झाली नाही. सोमवार, मंगळवारी किंमतीत पडझड दिसून आली. Gold Silver Price 27 March 2024

gold silver 1 jpg webp webp

काय आहे सोन्याचा दर
गुडरिटर्न्सनुसार, 22 कॅरेट सोन्याचा दर 61,300 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 66,860 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात गुरुवारी, 21 मार्च रोजी 1,000 रुपयांच्य उसळीमुळे 10 ग्रॅम सोन्याचा भाव 67,000 रुपयांच्या घरात पोहचला होता. त्यानंतर भाव उतरले. हा ट्रेंड या आठवड्याच्या सुरुवातीच्या दोन दिवसांत पण दिसून आला. सोन्यात सोमवारी कोणताच बदल दिसला नाही. तर 26 मार्च रोजी सोन्यात 100 रुपयांची घसरण दिसून आली.

---Advertisement---

चांदीचा दर
सध्या एक किलो चांदीचा भाव आता 77,500 रुपये आहे. यापूर्वी गेल्या आठवड्यात 21 मार्च रोजी चांदी 1500 रुपयांनी वधारली. त्यानंतर चांदीत नरमाई आली. दुसऱ्याच दिवशी चांदीत 2000 रुपयांची स्वस्ताई आली. या आठवड्यात सोमवारी चांदी 300 रुपयांनी वधारली. तर मंगळवारी 26 मार्च रोजी तितकीच घसरण झाली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---