जळगाव जिल्हाबातम्यावाणिज्य

सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात तेजी, आता कुठवर पोहोचला भाव?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ डिसेंबर २०२४ । देशभरात सध्या लग्न सराईचे दिवस सुरु असल्यामुळे अनेकजण या दिवसासाठी सोन्याची खरेदी करतायत. मात्र याच दरम्यान, सोन्याचा भाव पुन्हा एकदा वाढला आहे. आज सोने दरात वाढ झालेली दिसून आलीय. यामुळे आता सोन्याचा भाव 76 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे पोहोचला आहे, तर चांदीचा भाव 88 हजार रुपये प्रति किलोच्या पुढे गेला आहे.

सोन्याचा भाव आता 76 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे
राष्ट्रीय स्तरावर, 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याची किंमत 76635 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. गुरुवारी संध्याकाळी हा भाव 76336 रुपये होता, जो आज 76635 रुपयांवर पोहोचला आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 70198 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 18 कॅरेट सोन्याचा दर 57476 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 14 कॅरेट सोन्याची किंमत 44832 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

सोने आणि चांदीचा भाव कधी कमी होणार?
सोन्याच्या भावात होणारी वाढ अनेक घटकांवर अवलंबून असते. जागतिक बाजारपेठेतील चालू घडामोडी, रुपयाची किंमत, आणि आर्थिक स्थिती या सर्व घटकांचा सोन्याच्या भावावर परिणाम होतो. यावेळी सोन्याचा भाव वाढला आहे कारण ग्राहकांची मागणी वाढली आहे आणि जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. चांदीचा भाव 88434 रुपये प्रति किलो असून, त्यातही वाढ दिसून आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button