⁠ 
मंगळवार, सप्टेंबर 17, 2024
Home | वाणिज्य | Gold Silver Rate : ‘या’ आठवड्यात सोनं झालं स्वस्त, पण चांदी महागली ; पहा काय आहे दर??

Gold Silver Rate : ‘या’ आठवड्यात सोनं झालं स्वस्त, पण चांदी महागली ; पहा काय आहे दर??

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | २४ सप्टेंबर २०२३ । गेल्या आठवड्यात भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या (Gold Silver Rate) दरात दररोज बदल होताना दिसत आहेत. सोमवारपासून सुरू झालेल्या आठवड्यात शुक्रवारी शेवटच्या व्यवहारी सत्रापर्यंत सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली होती, मात्र या काळात चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी (18 सप्टेंबर) 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,423 रुपये प्रति ग्रॅम होता, जो शुक्रवारी शेवटच्या ट्रेडिंग सत्रात 54,285 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरला. म्हणजेच या काळात 22 कॅरेट सोने प्रति दहा ग्रॅम 138 रुपयांनी स्वस्त झाले.

तर 24 कॅरेट सोने 59,370 रुपये प्रति 10 ग्रॅमवरून 59,220 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​घसरले. म्हणजेच या आठवड्यात २४ कॅरेट सोने प्रति दहा ग्रॅम ५० रुपयांनी स्वस्त झाले आहे. गेल्या आठवड्यात चांदीच्या दरात वाढ झाली होती. चांदीचा भाव व्यापारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी 72,320 रुपये प्रति किलो होता, तो शुक्रवारी व्यापार आठवड्याच्या शेवटच्या दिवशी 73,340 रुपये प्रति किलोपर्यंत वाढला. म्हणजेच या काळात चांदीच्या दरात किलोमागे 1020 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली.

जळगावातील दर?
जळगाव सुवर्णनगरीत या आठवड्यात घसरण झालेली दिसून येतेय. मात्र चांदी पुन्हा वधारलेली आहे. सोमवारी (18 सप्टेंबर) रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी 54,590 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी 59,600 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. सध्या 22 कॅरेट सोन्याचा 54,410 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 59,400 रुपये इतका आहे. म्हणजेच या आठवड्यात सोन्याच्या किमतीत 200 ते 300 रुपयाची घसरण झालेली दिसून येतंय.

दुसरीकडे चांदीचा दर सोमवारी (18 सप्टेंबर) 72300 रुपये प्रति किलोवर होता. तो सध्या 73,300 रुपयावर गेला आहे. म्हणजेच चांदीच्या किमतीत तब्बल 1000 रुपयाची वाढ झालेली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.