जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२२ । देशात धनत्रयोदशीपासून दिवाळी सणाला सुरुवात होता. काल धनत्रयोदशी साजरी झाली. या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. त्यामुळे ग्राहकांची सोने-चांदी (Gold-Silver Rate) खरेदीसाठी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळेल. दरम्यान, जळगाव सुवर्णगरीत गेल्या वर्षीपेक्षा यंदा सोन्याच्या किमतीत मोठी घसरण दिसून येतेय. Gold Silver Price Today
यंदा जागतिक पातळीवर सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीचा परिणाम जळगावच्या सुवर्णनगरीत देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान आजच्या सोन्याच्या दरांबाबत बोलायचे तर आज हे दर 51,300 हजार रुपये प्रति ग्रॅम इतके आहेत. हाच दर गेल्या वर्षी 53 हजारावर होता. त्यातुलनेत यंदाच्या दिवाळीत सोने जवळपास 2 हजार रुपयांनी घसरले आहे. त्यामुळे नागरिकांनी सोने खरेदीसाठी जळगावच्या सुवर्णनगरीत गर्दी केली आहे. सुवर्णनगरीतील दुकानांमध्ये अक्षरशा नागरिकांची सोने खरेदीसाठी जत्रा भरल्याच चित्र पाहिलं जाऊ शकतं.दरम्यान, आज रविवारी चांदीचा एक किलोचा भाव 57,000 रुपये इतका आहे.
शनिवारी धनत्रयोदशीचा (Dhantrayodashi) सण साजरा झाला. जागतिक बाजारातील साकारात्ममुळे धनत्रयोदशी आणि दिवाळीत सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण झाली. देशातील विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या दराने सोन्याची विक्री होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीचे दर सातत्याने घसरत आहेत.
विक्रमी उच्चांकावरून सोने 3500 रुपयांहुन स्वस्त
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार सध्या २४ कॅरेट सोन्याची किंमत 50,062 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर यावर्षी 18 एप्रिल रोजी सोन्याने 53,603 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता. म्हणजेच सध्याच्या विक्रमी उच्चांकावरून सोने 3500 रुपयांहुन स्वस्त झाले आहे.
चांदीच्या दरात जोरदार घसरण
IBJA नुसार १ किलो चांदीची किंमत विक्रमी उच्चांकावरून 15,315 रुपयांनी घसरली असून यंदा 8 मार्च रोजी चांदी 70,890 रुपये प्रति किलोवर पोहोचली होती. सध्या चांदीचा भाव 55,500 रुपयांवर आला आहे. म्हणजेच चांदी विक्रमी उच्चांकावरून 15,330 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
सोने खरेदी करण्यापूर्वी शुद्धता तपासा-
सोने ही अत्यंत महत्त्वाची वस्तू मानली जाते. अशा स्थितीत सध्या बाजारात बिनदिक्कतपणे बनावट दागिन्यांची विक्री होत आहे. अशा परिस्थितीत, आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) लोकांना सोने खरेदी करण्यापूर्वी हॉलमार्क तपासण्याचा सल्ला देते. हॉलमार्कद्वारे तुम्ही खऱ्या आणि बनावट सोन्यात फरक करू शकता. यासोबतच सांगा की 18 कॅरेटवर 750, 21 कॅरेटवर 875, 23 कॅरेटवर 958 आणि 24 कॅरेट सोन्यावर 999 लिहिले आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याची खरेदी करा. तुम्हाला तुमच्या शहरातील 22 कॅरेट किंवा 18 कॅरेट सोन्याची किंमत जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन माहिती मिळवू शकता.