जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२६ । जागतिक बाजारपेठेतील वाढती अनिश्चितता आणि भू-राजकीय तणावाचा थेट परिणाम भारतीय सराफा बाजारावर दिसून येत आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या-चांदीकडे कल वाढल्याने सोन्यासह चांदीच्या किमतीने नको तो उच्चांक गाठला आहे. यामुळे खरेदीदारांची चिंता वाढली आहे.

दरम्यान आज बाजार उघडताच सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. सोन्यात प्रति तोळ्यामागे ५ हजारांची वाढ झाली आहे. यामुळे सोन्याने दीड लाखांचा टप्पा ओलांडला आहे. दुसरीकडे चांदीच्या किमतीत देखील सुरु असलेली दरवाढ कायम आहे. आज चांदी दरात देखील ५ हजारांची वाढ झाली.

काय आहे सोन्याचा दर
आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ५ हजार २० रुपयांनी वाढले आहेत. आज १ तोळा सोने १,५४,८०० रुपयांना विकले जात आहे. ८ ग्रॅममागे सोनं ४,०१६ रुपयांनी वाढले असून हे दर १,२३,८४० रुपये झाले आहेत. २२ कॅरेट सोन्याचे दर ४,६०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,४१,९०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ३,६८० रुपयांची वाढ झाली आहे. १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ३,७७० रुपयांची वाढ झाली आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ३०१६ रुपयांनी वाढ झाली असून ९२,८८८ रुपये झाले आहेत.

चांदीचा दर
सोन्यापाठोपाठ चांदी दरातही मोठी वाढ झाली. आज चांदी दरात प्रति किलो ५ हजार रुपयांची वाढ झाली. यामुळे एक किलो चांदीचा दर ३,२५,००० रुपयावर पोहोचला आहे.
जळगावात दोन दिवसात चांदी २७ हजाराने वाढ
जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या भावात काल मंगळवारी एकाच दिवसात तब्बल १७ हजारांची वाढ झाली. जळगाव सुवर्ण बाजाराच्या इतिहासात एकाच दिवसात चांदीच्या भावातील ही सर्वाधिक वाढ आहे.त्यामुळे चांदी तीन लाख १८ हजार रुपयांवर पोहोचली आहे. सोमवारी १० हजार रुपयांची वाढ झाली होती. यामुळे मागच्या दोन दिवसात चांदी दरात तब्बल २७ हजार रुपयाची वाढ झाली.





