जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२४ । जागतिक बाजारातील घडामोडीमुळे सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच असून आज गुरुवारी दोन्ही धातूंमध्ये वाढ नोंदवण्यात आली. याआधी बुधवारी दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण दिसून आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात MCX वरसकाळी 10 वाजेपर्यंत सोने 350 रुपयांनी तर चांदीमध्ये तब्बल 1200 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. सोन्या-चांदीची आजची नवीनतम किंमत काय आहे ते जाणून घेऊयात..
मल्टी कमोडिटी एक्सचेंज वरील सोन्याचा भाव?
आज गुरुवारी सकाळी बाजाराच्या सुरुवातीलाच सोने आणि चांदीचे दर हिरव्या चिन्हाने व्यवहार करत आहे.सकाळी 10 वाजेपर्यंत सोन्याचा दर 350 रुपयांनी वाढल्यामुळे 10 ग्रॅमचा भाव 72,082 रुपयावर व्यवहार करत आहे. याआधी काल बुधवारी सोन्याचा भाव 71732 रुपये प्रति 10 ग्रॅम या दराने बंद झाला होता.
अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कोणताही बदल न केल्याने गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली. मात्र, आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज वरील चांदीचा भाव?
चांदीबद्दल बोलायचे झाले तर, मल्टी कमोडिटी एक्सचेंज MCX वर आज सकाळी 10 वाजेपर्यंत चांदीची किंमत सुमारे 1266 रुपयांनी वाढली आहे.यामुळे चांदीचा भाव 90,741 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.
जळगावमधील सोने चांदीचा दर?
जळगाव सुवर्णपेठेतही सोन्यासह चांदीच्या दरात वाढ झाली आहे. काल सकाळी 72 हजाराच्या खाली आलेला सोन्याचा दर पुन्हा 72 हजारावर गेले आहे. सध्या 24 कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी 72300रुपये प्रति 10 इतका आहे. तर चांदीचा दर 90500 रुपये इतका आहे.
दरम्यान आगामी दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 80 हजारांवर तर चांदीचा दर 1 लाखावर जाणार असल्याचा अंदाज जाणकारांनी वर्तविला आहे.