⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | गुडन्यूज! आठवड्याभरात सोने 1350, तर चांदी 3000 रुपयांनी घसरली, आजचे नवे दर पहा..

गुडन्यूज! आठवड्याभरात सोने 1350, तर चांदी 3000 रुपयांनी घसरली, आजचे नवे दर पहा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२३ । दसरा सारख्या सणाला काही दिवस उरले असून त्यांनतर दिवाळी सणाला सुरुवात होईल. या काळात अनेक जण दागिने खरेदी करतात. या सणासुदीपूर्वी सोने आणि चांदी (Gold Silver Rata Today) खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला ग्राहकांना दिलासा मिळाला असून आज सोन्या-चांदीचे भाव पुन्हा कोसळले आहेत. पितृपक्षाचा काळ सुरु झाला असून या काळात दर घसरल्याने ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली होती. तर आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आज सोमवारी दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण झाली. गेल्या आठवड्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 1458 रुपयांनी घसरला होता. तर 24 कॅरेट सोने प्रति दहा ग्रॅम 1590 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर आज 2 ऑक्टोबर रोजी सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम किंचित 35 घसरण झालेली दिसून आली.

MCX वर आज सकाळी 11 वाजेपर्यंत सोन्याचा दर 35 रुपयांनी घसरून 57,096 रुपयावर व्यवहार करत आहे. दुसरीकडे चांदीच्या किमतीत देखील मोठी घसरण झाली आहे. MCX वर आज सोमवारी चांदीच्या दरात 730 रुपयाची घसरण झाली असून यामुळे चांदीचा प्रति किलोचा दर 69,870 रुपयावर व्यवहार करत आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात चांदीचा भाव 3340 रुपयांची घसरण झाली होती.

जळगावमधील दर?
जळगाव सुवर्णनगरीत गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात 1350 रुपयांची घसरण झाली. सप्टेंबरचा विचार केला तर शनिवारी (महिना अखेर) 1500 रुपयांची घसरण नोंदवली गेली. यात अनेकदा दरवाढ झाली आणि सोने 59,900 पर्यंत पोहोचले पण 60 हजारांचा टप्पा गाठला नाही. सध्या जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी 58,000 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जात आहे. दरम्यान, दरातील ही घसरण सामान्य असून पितृ पक्षात दर आणखी घसरतील आणि नवरात्रीपासून वाढ होऊ शकते.

दुसरीकडे चांदीच्या किमतीत बोलायचे झाले यापूर्वी गेल्या सोमवारी (25 सप्टेंबर) चांदीचा दर 73,500 रुपयावर होता. सध्या एक किलो चांदीचा दर 70500 रुपयांवर आले आहे. म्हणजेच जळगावमध्ये चांदीच्या किमतीत जवळपास 3000 रुपयाची घसरण झालीय.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.