जळगाव लाईव्ह न्यूज । २ डिसेंबर २०२४ । इस्राइल- युक्रेन युद्धाचे पडसादासह अमेरिकन राष्ट्रपती निवडणुकीमुळे सोन्याच्या दरात तेजी-मंदी सुरू आहे. सध्या देशात लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला जर सोने (Gold) खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
१ नोव्हेंबर रोजी सोन्याचे प्रति तोळ्याचे दर ७९,७०० रुपये होते. महिन्याच्या शेवटच्या दिवशी ते ७७,००० पर्यंत खाली आल्याने महिन्याभरात २७०० रुपयांची घसरण झाली आहे. याच बरोबर ९८,००० रुपये किलो दराची चांदी नोव्हेंबर अखेरीस ९१ हजार रुपयांवर आली म्हणजे सात हजारांची घसरण झाली.
मात्र येत्या महिन्याभरात सोने दरात प्रति तोळा ३ हजार रुपयांची वाढ होण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढ उत्तार होतात. त्या तुलनेत गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात स्थिरता होती.
नोव्हेंबर महिन्यात सोन्याच्या दरात २७०० रुपयांची तर चांदीच्या दरात ७ हजार रुपयांची घसरण नोंदवली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात सोन्याचे दर ३४०० रुपयांनी तर चांदी ७ हजार रुपयांनी वाढली. दरम्यान, सोन्याचे प्रतितोळाचे दर ७७००० तर चांदीचे दर प्रतिकिलो ९१००० हजार होते. आठ दिवसांपासून त्यात चढ-उतार सुरू आहे.