ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! सोने सलग दुसऱ्या दिवशी झाले स्वस्त, १० ग्रॅमचा दर जाणून घ्या
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जानेवारी २०२३ । जागतिक बाजारातील कमकुवत प्रवृत्तीमुळे मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याची किंमत पुन्हा घसरली आहे. मात्र दुसरीकडे चांदीच्या किमतीत वाढ झालेली दिसून येतेय. सोन्याच्या किमतीत घसरण झालेली असली तरी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 56 च्या वरच आहे.
MCX वरील सोने-चांदीचा भाव?
आज बुधवारी सोन्याने MCX वर सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोन्याचा भाव 200 रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे आता 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,170 रुपयांवर व्यवहार करत आहे. यापूर्वी काल मंगळवारी सोन्याचा भाव 130 रुपयांनी घसरून 56,680 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर दुसरीकडे आज मात्र चांदीच्या किमतीत वाढ झालेली आहे. आज चांदीचा भाव किंचित 30 रुपयांनी वाढून 69,212 रुपये प्रति किलो इतका आहे.
आज सोमवारी, फ्युचर्स मार्केटमध्ये २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा दर 10 ग्रॅम 56,494 रुपये होता, 9.20 पर्यंत 173 रुपयांनी वाढला. आज सोन्याचा व्यवहार 56,467 रुपयांपासून सुरू झाला. सुरुवातीच्या व्यापारात एकदा किंमत 56,500 रुपयांपर्यंत गेली. पण, नंतर तो तुटला आणि 56,494 रुपयांवर व्यवहार सुरू झाला. काल चांदीचा भावही २३२ रुपयांच्या घसरणीसह ६९,७९३ रुपये प्रति किलोवर बंद झाला.
जळगावातील दर
जळगावात सध्या 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव अंदाजित 52000 रुपये इतका आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56 हजार 600 रुपये इतका आहे.
सोन्याच्या किमतीने अडीच वर्षाचा रेकॉर्ड मोडला आहे. यापूर्वी कोरोना लॉकडाऊन दरम्यान, ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचा भाव 56,200 रुपयांवर गेला होता. दरम्यान, आता सोन्याच्या दरात वाढ होत असल्याने अनेकांनी आता खरेदीकडे पाठ फिरवली आहे. दरम्यान, आगामी काही दिवसात सोन्याचा भाव 60 हजार रुपयांवर जाणार असल्याचे मत तज्ज्ञांनी वर्तविला आहे.