---Advertisement---
वाणिज्य

सोने-चांदीच्या दरवाढीला अखेर ब्रेक, आज झाली मोठी घसरण ; वाचा आजचे नवीन दर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२२ । गेल्या काही दिवसापासून भारतीय वायदा बाजारात, सोने (Gold Rate) आणि चांदीच्या (Silver Rate) किमतीत वाढ होत असल्याचे दिसून आले. मात्र या दरवाढीला आज ब्रेक लागला आहे. आज गुरुवारी सोन आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सोन 53 हजाराखाली आली आहे. तर दुसरीकडे चांदी 62 हजाराखाली आलीय. Gold Silver Price Today

gold silver rate jpg webp

आज गुरुवारी सकाळी 10 वाजेपर्यंत वायदे बाजारात २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 230 रुपयांनी घसरून 52,836 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. तर आज, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीच्या किमतीत देखील मोठी घसरण झाली आहे. आज चांदी 730 रुपयांनी घसरली आहे. त्यामुळे एक किलो चांदीचा भाव 61,268 रुपयांवर व्यवहार करत आहे. सकाळी चांदीचा भाव 61,760 रुपयांवर खुला होता. एकदा किंमत 62,770 रुपयांवर गेली. पण नंतर घसरण होऊन 61,268 रुपये झाली.

---Advertisement---

आज आंतरराष्ट्रीय बाजारात मंदी
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीचे भाव कमजोर आहेत. काल सोन्याच्या दरात वाढ झाली, तर चांदीच्या दरात घसरण झाली. सोन्याचा स्पॉट भाव आज 0.93 टक्क्यांनी घसरून $1,764.42 प्रति औंस झाला. त्याच वेळी, आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीचा भाव 1.36 टक्क्यांनी घसरून 21.31 डॉलर प्रति औंस झाला.

जळगाव सुवर्णनगरीतील भाव?
मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीचे दर वाढताना दिसून आले. त्यामुळे जळगाव सुवर्णनगरीत देखील सोने आणि चांदीच्या किमतीत जोरदार वाढ दिसून आलीय. गेल्या आठ ते दहा दिवसापूर्वी 51 हजाराखाली असलेला सोन्याचा भाव आता 53 हजारावर गेला आहे. सध्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव 53,100 रुपये इतका आहे. दुसरीकडे चांदी 63,000 रुपये प्रति किलो इतकी आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---