---Advertisement---
सोने - चांदीचा भाव

Gold Silver Price : गुडन्यूज, सोने-चांदीच्या भावात घसरण, जाणून घ्या आजचे भाव

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ डिसेंबर २०२१ । गेल्या काही दिवसापासून जळगाव सराफ बाजारात सोने (Gold Rate) आणि चांदीच्या (Silver Rate) भावात तेजी दिसून आली. सलग दोन दिवस दोन्ही धातूंमध्ये वाढ दिसून आली. मात्र आज सोने-चांदी भाव वाढीला ब्रेकला आहे. आज बुधवारी सोने २४० रुपयाने स्वस्त झाले आहे. तर चांदी तब्बल ७९० रुपयांनी स्वस्त झाली आहे. त्यापूवी सोन्याच्या भावात १५० रुपयाची वाढ झाली होती तर  चांदीच्या भावात ४५० रुपयाची वाढ झाली होती.

gold silver price jalgaon

आजचा सोने-चांदीचा भाव? (Gold-Silver Rate)

---Advertisement---

जळगाव सराफ बाजारात आज बुधवारी २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ४९,४४० रुपये नोंदवले गेले. चांदीचे दर किलोमागे ६३,०३० नोंदवले गेले. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

गेल्या वर्षभरापासून सोन्याचे दर सातत्याने अस्थिर असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर सर्वोच्च स्थरावर म्हणजे प्रति तोळा ५६ हजार इतके झाले होते. मात्र त्यानंतर त्यात सातत्याने घसरण होत गेली. या वर्षीच्या एप्रिल महिन्यात तर सोन्याचे दर ४४ हजारांपर्यंत खाली आले होते. मात्र त्यानंतर जून महिन्यात सोन्याचा दर पुन्हा ५० हजारांवर गेला होता. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सोन्याचा ४७ हजारांवर आला होता. मात्र, नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तो पुन्हा वाढताना दिसून येत आहे.

असे होते मागील आठवड्यातील दर?

६ डिसेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०३० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६२,९६० रुपये असा होता. ७ डिसेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०४० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६२,७१० रुपये इतका नोंदविला गेला. ८ डिसेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,१९० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,२८० रुपये इतका नोंदविला गेला. ९ डिसेंबर (गुरुवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,१८० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,०७० रुपये इतका नोंदविला गेला.१० डिसेंबर (शुक्रवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०६० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,२२० रुपये इतका नोंदविला गेला.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---