⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 30, 2024
Home | सोने - चांदीचा भाव | खुशखबर! सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, ग्राहकांनो खरेदीला उशीर करू नका..

खुशखबर! सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, ग्राहकांनो खरेदीला उशीर करू नका..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२३ । सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आज शनिवारी सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाली असून यामुळे सोन्याचा भाव 60 हजाराखाली आला आहे. तर चांदीचा दर 75 हजाराच्या घरात आला आहे. Gold Silver Price Today

ऐन लगीन सराई आणि साडे तीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या तोंडावर सोने – चांदीच्या किमतीने नवा उच्चांक गाठला आहे. मागील काही दिवसापासून सुरु असलेली दरवाढ आज आठवड्याच्या शेवटची दिवशी थांबली आहे.

जळगाव सुवर्णनगरीतील आजचा सोन्याचा दर? Gold Rate Today
जळगाव सुवर्ण नगरीत आज शनिवारी सकाळी 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,800 (विना जीएसटी) इतका आहे. काल सकाळी 61,500 रुपये रुपये इतका होता. म्हणजेच त्यात 700 रुपयाची घसरण झाली आहे. मात्र या संपूर्ण आठवड्यात सोन्याचं किमतीत वाढ झालेली दिसून येतेय. सोमवारी (10 एप्रिल) सोन्याचा दर विना जीएसटी 60,200 रुपये इतका होता. तर मंगळवारी 60,500,बुधवारी 61,100, गुरुवारी 61,100, शुक्रवारी 61,500 आणि आज शनिवारी 60,800 रुपये प्रति तोळा इतका आहे.

GOLD : सोन्याचा दर कुठपर्यंत जाणार?

आजचा चांदीचा दर | Silver Rate Today
जळगाव सुवर्ण नगरीत आज सकाळच्या सत्रात चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. आज सकाळी एक किलो चांदीचा भाव 75,900 रुपये (विना जीएसटी) इतका आहे. यापूर्वी काल सकाळी चांदीचा दर 77,500 रुपये इतका होता. म्हणजेच त्यात एका दिवसात तब्बल 1600 रुपयाची घसरण झाली आहे.

या आठवड्याच्या चांदीच्या किमतीत मोठी वाढ झालेली दिसून येतेय. सोमवारी (10 एप्रिल) विना जीएसटी एक किलो चांदीचा दर 74,600, मंगळवारी 74,800 रुपये, बुधवारी 76000, गुरुवारी 76,500, शुक्रवारी 77,500 रुपये आणि आज शनिवारी 75,900 रुपये इतका आहे. मात्र येत्या काही दिवसात सोने 80000 रुपयापर्यंत जाणार असल्याचा अंदाज आहे.

हे आहे सोन्याच्या दरवाढीचे कारण?
अमेरिकन फेडरल बँकेने आपल्या व्याजविषयक धोरणात जे काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे ते पाहता गुंतवणूक दाराना बँकेत पैशांची गुंतवणूक करण्यापेक्षा सोन्यात गुंतवणूक करणे हे सोईचे आणि सुरक्षित वाटत आहे. अनेकांनी सोन्याच्या गुंतवणुकीकडे आपला कल वाढवल्याने जागतिक पातळीवर सोन्याच्या  मागणीत मोठी वाढ झाली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.