जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२२ । तुम्ही जर आज सोने आणि चांदी (Gold Silver Price) खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी गुडन्यूज आहे. आजच्या सकाळच्या सत्रातील सोने आणि चांदीच्या किमती जाहीर झाल्या आहे. व्यवहाराच्या सुरुवातीलाच सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 50 हजाराच्या उंबरवठ्यावर आला आहे. त्यामुळे खरेदीही ही संधी सोडू नका. Gold Silver Rate Today
MCX वरील आजचा सोने आणि चांदीचा भाव?
MCX वर, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर सकाळी 9.30 वाजता 113 रुपयांनी घसरून 50,0025 रुपये प्रति 10 ग्रॅम आले आहे. यापूर्वीच मंगळवारी सकाळच्या सत्रात सोने 251 रुपयांनी घसरून 50,380 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले होते. त्यानंतर दुपारच्या सत्रात त्यात पुन्हा घसरण दिसून आलीय. तर दुसरीकडे मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये आज चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. बुधवारी चांदीचा दर 500 रुपयांनी घसरून 56,330 रुपये प्रति किलो झाला आहे. दरम्यान, उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी घसरण
बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. आज सोन्याचा भाव 1.43 टक्क्यांनी घसरला आहे, तर बुधवारी चांदीचा दरही 2.73 टक्क्यांनी घसरला आहे. सोन्याची स्पॉट किंमत आज 1700.08 डॉलर प्रति औंस झाली आहे. त्याचप्रमाणे, आज आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची स्पॉट किंमत 19.03 डॉलर प्रति औंस झाली आहे.
जळगावमधील दर
जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या भावात 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव जवळपास 51,200 रुपये इतका आहे. तर चांदीचा भाव प्रति किलो जवळपास 57,800 इतका आहे. दरम्यान, चांदीच्या भावात मागील काही दिवसात मोठी वाढ झालेली दिसून येतेय. सोमवारी चांदीचा दर 56,500रुपये इतका होता. त्यानंतर मंगळवारी 56,650 रुपये इतका आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
पितृपक्षात कमी व्यवसाय
हिंदू धर्मातील सनातन संस्कृतीत १६ दिवसांचा पितृ पक्ष पंधरवडा मानला जातो. या काळात सर्व प्रकारचे मांगलिक, वैवाहिक आणि इतर शुभ कार्ये केली जात नाहीत. पितृ पक्षाचा प्रभाव काही व्यवसायांवर जास्त तर काहींवर कमी झाला आहे. सोन्या-चांदीच्या व्यवसायावर सर्वाधिक परिणाम झाला आहे.
अशा प्रकारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता
आता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या (गोल्ड) माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबतची माहितीही लगेच मिळणार आहे.