जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२४ । मे महिन्यात उच्चांक गाठणाऱ्या सोने चांदीच्या दरात जून महिन्यात दिलासा मिळाला होता. मात्र जुलै महिन्यात दोन्ही धातूंच्या किमतींनी उसळी घेतल्याचं दिसून आले. जुलै महिन्याच्या या 14 दिवसांत सोने आणि चांदीत चढउताराचे सत्र दिसले.
यादरम्यान चांदीत मोठी उसळी दिसली. चांदी तब्बल 5 हजारांपेक्षा अधिकने वधारली. तर सोन्याने पण 2,000 रुपयांहून अधिकची वाढ नोंदवली. या आठवड्यात चांदीला दमदार कामगिरी करता आली नाही. केवळ 1200 रुपयांनी किंमत वधारली. तर सोने या आठवड्यात 550 रुपयांनी महागले. आता काय आहेत मौल्यवान धातूंच्या किंमती?
सोन्यात काय अपडेट
या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्यात 600 रुपयांची घसरण झाली. त्यानंतर सोने 550 रुपयांनी वधारले. तर आठवड्याच्या अखेरीस मौल्यवान धातूला कोणतीही मोठी कामगिरी करता आली नाही. आठवड्याच्या अखेरीस मुसंडी मारण्याचा ट्रेंड दिसला नाही. सोने 8 जुलैला 220 आणि 9 जुलैला सोने 380 रुपयांनी उतरले. तर 11 जुलैला सोने 220 रुपयांनी वाढले. 12 जुलै रोजी सोने 330 रुपयांनी वधारले. त्यानंतर सोन्याच्या आघाडीवर शांतता आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
जुलै महिन्यात चांदीने दमदार बॅटिंग केली. चांदी जवळपास 6,000 रुपयांनी वधारली. या आठवड्यात 8 जुलैला चांदी 200 रुपयांनी वाढली. तर 9 जुलै रोजी 500 रुपयांनी उतरली. 11 जुलैला चांदी 1 हजारांनी महागली. त्यानंतर किंमतीत अपडेट दिसली नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 95,500 रुपये आहे.