जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२१ । जून महिन्यात बाजारपेठ अनलॉक होताच काही दिवस सोने दरात सातत्याने घसरण होत असल्याचे दिसून आले. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोने दर वाढीस गेल्याने सोने पुन्हा एकदा ४८ हजारापार गेले आहे. दरम्यान, जळगाव सराफ बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही धातूंचे दर स्थिर राहिल्यानंतर आज सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे.
आज २२ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत १०० रुपयांनी वाढली. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ११० रुपयांनी वाढला. तर चांदी प्रति किलो २०० रुपयाने स्वस्त झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधांनंतर १ जूनपासून बाजारपेठ सुरू झाली आणि सोने-चांदीच्या भावात काही दिवस भाववाढ होत राहिली. त्यामुळे १० जून रोजी सोने ५० हजारांवर पोहोचले होते. त्यानंतर, मात्र त्यात घसरण होत गेली व २५ जूनपर्यंत ते ४७ हजार ५०० रुपयांपर्यंत आले होते. नंतर १ जुलैपासून दररोज भाववाढ होत गेली. जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी २१० रुपयांनी वाढ होऊन ४७ हजार ४९० रुपयांवर पोहोचले.
आठवड्याच्या विचार केला तर सरत्या आठवड्यात सराफा बाजारात सोन्यामध्ये ४८० रुपयांची वाढ झाली. तर चांदीमध्ये देखील ९०० रुपयांची घसरण नोंदवण्यात आली. लग्नसराई जवळपास संपल्याने स्थानिक बाजारातही सोन्याला फारसा उठाव नाही. त्यामुळे गेल्या दोन तीन दिवसापासून जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या दरात चढ उतार दिसून येत आहे.
आजचा सोन्याचा भाव
२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,८१२ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४८,१२० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम १ ग्रॅम चा दर ४५८३ रुपये असून १० ग्रॅमचा सोन्याचा भाव ४५,८३० रुपये आहे.
चांदीचा भाव
आज चांदी २०० रुपयाने स्वस्त झाली आहे. त्यामुळे आज चांदीचा एक किलोचा भाव ७३,९०० रुपये इतका आहे.