जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२४ । गेल्या आठवड्यापासून सोने आणि चांदीच्या दरात वाढ होताना दिसून आली. अनेक दिवसापासून ७२ हजाराच्या घरात असलेला सोन्याचा दर पुन्हा ७३ हजारांवर पोहोचला. सोबतच चांदीतही मोठी वाढ दिसून आली. यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले.
अखेर या दरवाढीला जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात ब्रेक लागला. गेल्या आठवड्यात चांदी 5,000 रुपयांनी तर सोने 1500 रुपयांनी वधारले होते. त्यानंतर आता सोन्यासह चांदीत घसरण दिसून आली.
8 जुलै रोजी सोने 220 रुपयांनी घसरले. मंगळवारी 9 जुलै रोजी सोने 380 रुपयांनी उतरले. तर आजही सोन्यात सकाळच्या सत्रात घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
जुलै महिन्यात चांदीने दरवाढीची मोठी आघाडी उघडली. पहिल्या आठवड्यात चांदी 5,000 रुपयांनी चमकली. या आठवड्याच्या सुरुवातीला 8 जुलै रोजी चांदी 200 रुपयांनी वधारली. तर 9 जुलै रोजी चांदीत 500 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 94,500 रुपये आहे. आज सकाळच्या सत्रात चांदीत घसरणीचे संकेत मिळत आहेत.