---Advertisement---
सोने - चांदीचा भाव

सोनं-चांदी झाली स्वस्त ; तपास आजचा प्रति तोळ्याचा भाव

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२१ । आज सलग दुसऱ्या दिवशी जळगाव सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. आज बुधवारी सोनं प्रति १० ग्रॅम ५०० रुपयाने स्वस्त झालं आहे. तर चांदी प्रति किलो ६८० रुपयाने स्वस्त झालीय. त्यापूर्वी काल मंगळवारी सोनं १०० रुपयाने स्वस्त तर चांदी ८० रुपयाने महागली होती.

gold silver

शेअर बाजारात तेजी आल्यामुळे देशांतर्गत सोने आणि चांदीच्या भावात घसरण नोंदविली गेली होती. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीत मोठी वाढ नोंदविली गेली होती. परंतु गेल्या दोन दिवसापासून सोने दर घसरत आहे. तर चांदी दरात दोन दिवसात एक दिवस वाढ झाली आहे.

---Advertisement---

गेल्या दोन दिवसात सोनं चांदी  ६०० रुपयाने कमी झालीय. ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोनं दर कमी होत असल्याने सोन खरेदी करण्याची हीच चांगली संधी आहे.

जळगाव सराफ बाजारात गेल्या गेल्या आठवड्यात सोने ५६० रुपयाने स्वस्त झालं आहे. तर चांदीच्या भावात ९२० रुपयाने स्वस्त झाली आहे.

ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याच्या भावाने प्रती १० ग्रॅमसाठी ५६ हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आता जवळपास ८ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सोन्याच्या दरावर चांगलाच परिणाम झाल्याचं दिसून आलंय.

सध्या सोन्याच्या किंमती आवाक्यातील असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हाच योग्य काळ असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. येत्या काळात सोन्याच्या किंमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.

आजचा जळगावातील सोन्याचा दर
२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ४८०४ रुपये इतका आहे तर १० ग्रॅम ४८,०४० रुपये आहे.

आजचा जळगावातील चांदीचा भाव
चांदीचा एक किलोचा भाव ६६,१४० रुपये इतका आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---