जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ जून २०२१ । जळगावच्या सुवर्णबाजारात गेल्या दिवसापासून सोने आणि चांदीच्या किमतीत चढउतार दिसून आले. काल गुरुवारी सोन्याचे दर स्थिर ठेवल्यानंतर आज शुक्रवारी पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. तर चांदीच्या भावात देखील मोठी वाढ झाली आहे. आज सोने प्रति १० ग्रम २१० रुपयाने तर चांदी तब्बल १००० रुपयाने वाढली आहे.
देशांतर्गत बाजारात सलग दुसर्या दिवशी सोनेच्या किमती वाढल्यात. जळगावच्या सुवर्णबाजारातही सोने चांदीच्या दरात चढ उतार दिसून येत आहे. सततच्या चढ उताराने सोने एकदा पुन्हा ५० हजाराच्या उंबरठ्यावर आले आहे.
आजचा सोन्याचा भाव
२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,९९१ रुपये झाला आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४९,९१० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,७५३ रुपये इतका आहे. तर १० ग्रामसाठी तुम्हाला ४७,५३० रुपये मोजावे लागतील.
चांदीचा भाव
तर चांदीच्या गेल्या आठवड्यात मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात चांदी ५ हजारपर्यंत स्वस्त झाली आहे. आज चांदीच्या भावात १००० रुपयाची वाढ झाली आहे. त्यामुळे आज चांदीचा १ किलोचा भाव ७२,९०० रुपये आहे.