उच्चांक किमतीपेक्षा सोने 5600 रुपयांनी स्वस्त, वाचा आजचा सोने-चांदीचा दर?
जळगाव लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२२ । गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. आज बुधवारी सुरूवातीच्या व्यवहारात सोन्याच्या (Gold Rates) दरात तेजी दिसून आली. सोबतच चांदी देखील वधारली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोन्याच्या किमतीत 108 रुपयापर्यंतची वाढ दिसून आलीय. तर चांदी 70 रुपयांनी महागली आहे. गेल्या काही दिवसापासून सोने दरात वाढ होत असल्याने दर पुन्हा एका वरच्या दिशेने जात आहे. मात्र असे असले तरी उच्चांक किमतीपेक्षा सोने अजूनही 6000 रुपयांपर्यंत स्वस्त विकले जात आहे. Gold Silver Price Today
MCX वरील आजचा सोने-चांदीचा दर?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सकाळी 10.30 वाजेला 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 108 रुपयांनी वाढून घसरून 50,610 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. यापूर्वी कालच्या सत्रात देखील सोन्याच्या किमतीत जवळपास 200 रुपयापर्यंतची वाढ झाली. दुसरीकडे आज चांदी दर 70 रुपयापर्यंत वधारला आहे. त्यामुळे एक किलो चांदीचा दर 58,917 रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वी कालच्या दुपारच्या सत्रात चांदीच्या किमतीत जवळपास 1000 रुपयापर्यंतची वाढ दिसून आलीय. दरम्यान, उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
जळगाव सुवर्णनगरीतील दर?
जळगाव सुवर्णनगरीतही सोन्याच्या किमतीत मोठी वाढ दिसून येतेय. सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,532 रुपये इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 50,800 रुपये इतका आहे. यापूर्वी हा दर 50,600 रुपये इतका होता. दुसरीकडे चांदी दर सध्या 58,800 रुपयापर्यंत आहे. यापूर्वी चांदीचा दर 58,000 रुपयापर्यंत होता. म्हणजेच चांदी एकाच दिवसात 800 रुपयांनी वधारली आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
उच्चांक किमतीपेक्षा सोने अजूनही 5600 रुपयांनी स्वस्त?
सोने सध्या त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 5600 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. कोरोना काळात ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. त्याच वेळी, चांदी त्याच्या सर्वोच्च स्तरावरून सुमारे 21,180 रुपये प्रति किलो दराने स्वस्त आहे. चांदीची आतापर्यंतची सर्वोच्च पातळी 79980 रुपये प्रति किलो आहे.
सोन्याची शुद्धता कशी तपासावी?
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.