जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२४ । मार्च आणि एप्रिल महिन्यात सोन्यासह चांदीच्या किमतीने मोठी उसळी घेतल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. मात्र गेल्या दोन-तीन आठवड्यात दोन्ही धातूंमध्ये घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र या आठवड्यात दोन्ही धातूंनी पुन्हा मोठी लांब उडी मारली. ऐन अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्यासह चांदीने मोठी झेप घेतल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या अपेक्षेवर पाणी फेरल आहे. या आठवड्यात सोने चांदीत मोठी वाढ झाली.
जळगाव सुवर्णपेठेत या आठवड्यात सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव १४०० ते १५०० रुपयांनी वाढला आहे. गेल्या रविवारी सकाळच्या सत्रात सोन्याचा दर विनाजीएसटी ७१,७०० रुपयावर आला होता. तो आता ७३,१०० रुपयांवर गेला आहे.
दुसरीकडे या आठवड्यात चांदी दरात ३००० हजार रुपयापर्यंतची वाढ दिसून येत आहे. गेल्या रविवारी सकाळच्या सत्रात चांदीचा प्रति किलोचा दर विनाजीएसटी ८१००० रुपयांवर होता. तो आता ८४००० रुपयावर पोहोचला आहे.
मार्च-एप्रिल सारख्या या महिन्यात पण किंमती गगनाला भिडतात की काय अशी भीती ग्राहकांना वाटत आहे.