Gold Rate : ‘या’ आठवड्यात सोन्याच्या दरात मोठा बदल, अचानक दर ‘एवढा’ पोहोचला..
जळगाव लाईव्ह न्यूज । २० नोव्हेंबर २०२२ । लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. या आठवड्यातही सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. मात्र, सध्या सोन्याचा भाव ५३ हजार रुपयांच्या खाली आहे. शुक्रवारी, या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, सोन्याचे दर (Gold Rate) प्रति 10 ग्रॅम 52,918 रुपये बंद झाले. नोव्हेंबरच्या सुरुवातीला सोन्याचा भाव 50,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. मात्र सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर दरात तेजी आली आहे. मात्र, सोन्याचा दर अजूनही या वर्षातील सर्वोच्च दरापेक्षा कमीच आहे.
या आठवड्यात सोन्याच्या दराची स्थिती
लग्नसराईचा परिणाम सोन्याच्या भावावर दिसून येत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवशी सोमवारी सोन्याचा भाव 52,560 रुपये होता. मंगळवारी, किमतीत किंचित वाढ झाली आणि ती 52,877 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. बुधवारी सोन्याचा भाव 52,952 रुपये, गुरुवारी 52,853 रुपये आणि शुक्रवारी 52,918 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला.
या आठवड्यात सोने किती महाग झाले
IBJA दरांनुसार, गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा भाव 52,277 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, या आठवड्यात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 641 रुपयांनी वाढ झाली आहे.
सर्वोच्च किंमत
दरम्यान, रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून देशात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. या वर्षीच्या मार्च महिन्यात सोन्याचा भाव 54,330 रुपये होता, जो या वर्षातील आतापर्यंतचा उच्चांक आहे. यानुसार पाहिले तर 10 ग्रॅम सोन्याचे सध्याचे दर आजही 1400 ते 1450 रुपयाने स्वस्त विकले जात आहे.
24 कॅरेट सोन्याची किंमत
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 18 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत कमाल 52,953 रुपये होती. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 52,741 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. सर्व प्रकारच्या सोन्याचे दर कर न लावता मोजले गेले आहेत. सोन्यावर GST चार्जेस वेगळे भरावे लागतात. तुम्ही सोन्याचे दागिने विकत घेतल्यास GST व्यतिरिक्त तुम्हाला मेकिंग चार्जेस देखील द्यावे लागतील. त्यामुळे सोन्याच्या बिस्किटांपेक्षा दागिन्यांच्या किमती अधिक आहेत.