जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२५ । आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेमुळे आणि जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीने एक लाखांपर्यंतचा टप्पा गाठला. ही आतापर्यंतची विक्रमी पातळी होती. दरम्यान विक्रमी पातळी गाठल्यानंतर, सोन्याच्या किमतीत घसरण दिसून येत आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अलिकडच्या विधानांनंतर सोन्याच्या किमतीत ही घसरण दिसून येत आहे. त्यांच्या विधानामुळे गुंतवणूकदारांमधील भीती कमी झाली झाल्यामुळे सोन्याचे दर घसरल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. आज २३ एप्रिल रोजी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. णून घ्या सोन्याच्या दरात नेमकी किती रुपयांनी घसरण झाली आहे आणि 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे दर नेमके काय आहेत.
आज बुधवारी (23 एप्रिल 2025) सोन्याच्या दरात मोठी घसरण दिसून येत आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 3000 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे हा दर 101,350 रुपयांवरुन 98,350 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.तर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याच्या दरात 2750 रुपयांनी घसरण झाली आहे. यामुळे हा दर 92,900 रुपयांवरुन 90,150 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. दुसरीकडे आज चांदीचा एक किलोचा दर १,०१,००० रुपये इतका आहे. चांदीचा भाव सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर गेलेला पाहायला मिळाला होता.
दरम्यान अक्षय्य तृतीयेला लोक सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. यावेळी अक्षय्य तृतीयेचा सण ३० एप्रिल २०२५ रोजी साजरा केला जाणार आहे. मात्र त्यापूर्वी एक लाखावर गेलेला सोने दरात मोठी घसरण आहे. अक्षय्य तृतीये सोनं स्वस्त झाल्याने ग्राहकांना आता दिलासा मिळाला आहे.
जळगावातील 22 आणि 24 कॅरेटचा दर
आजचा 24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 98,350 रुपये
कालचा सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम)- 1,01,350 रुपये
22 कॅरेटचा आजचा दर
आजचा सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 90,150
कालचा सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम)- 92,900