---Advertisement---
जळगाव जिल्हा वाणिज्य

Gold Rate ! जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोन्याचा दर एक लाखाच्या उंबरवठ्यावर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२५ । एकीकडे लग्नसराईची धामधूम सुरु असताना जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोन्याचा दर एक लाखाच्या उंबरवठ्यावर पोहोचला आहे. यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे डोळे पांढरे पडले आहे.

gold silver jpg webp

आज सोमवारी जळगावच्या सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर ९६७०० (जीएसटीसह ९९,६००) रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे. तर २२ कॅरेटचा दर ८८,५७७ (जीएसटीसह ९१,२४३) इतका आहे. येत्या काही दिवसांत हे दर एक लाखांचा टप्पा सहज पार करतील, असा अंदाज सोने व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. आज चांदीचा एक किलोचा दर 96500 (जीएसटीसह 99400) इतका आहे.

---Advertisement---

दरवाढीमागील कारण काय?
खरंतर अमेरिका आणि चीनमधील सुरू असलेल्या व्यापार संघर्षाचा परिणाम जागतिक बाजारपेठेत दिसून येत आहे. व्यापार युद्धामुळे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे गुंतवणुकदारांनी आपला मोर्चा सर्वात सुरक्षित पर्याय मानल्या जाणाऱ्या सोन्याकडे वळवला आहे. परिणाम भारतातील, विशेषतः जळगावसारख्या सुवर्ण नगरीतील दरांवर झाला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment