---Advertisement---
जळगाव जिल्हा वाणिज्य

स्वस्त खरेदीची संधी! सोन्याचा भाव ‘इतक्या’ हजारांनी घसरला.. जळगावात आताचे दर काय?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२५ । गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिका-चीन व्यापार युद्ध आणि त्यापाठोपाठ भारत-पाक युद्धाच्या शक्यतेमुळे सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली होती. सोन्याचा दर पुन्हा लाखाच्या वर गेला होता. मात्र सध्या भारत-पाकमधील युद्धाच्या शक्यतेमुळे देशातील आर्थिक विश्वावर असलेली अस्थिरतेची टांगती तलवार दूर झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात (Gold Price) सातत्याने घसरण होताना दिसत आहे. दरम्यान आज गुरुवारी देखील सोने दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचा दर दोन हजाराहून अधिकने घसरला

gold silver 1

२४ कॅरेट सोन्याचा दर
goodreturns वेबसाईटनुसार, जळगाव सराफ बाजारात सोने दरात मोठी घसरण दिसून आली. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम २१३० रूपयांनी घसरून ९३,९३० रूपये झाला आहे. तर, १ ग्रॅम सोन्याचा दर २१३ रूपयांनी घसरून ९३९३ रूपये झाला आहे.

---Advertisement---

२२ कॅरेट सोन्याचा दर
२२ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर तब्बल १९५० रूपयांनी घसरून ८६,१०० वर आला आहे. तर, २२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा दर १९५ ने घसरून ८६१० रूपयांवर पोहोचला आहे. ही किंमत गेल्या काही दिवसांतील सर्वात मोठी घसरण मानली जात आहे.

तर १ किलो चांदीचा दर ९०० रूपयांनी घसरून ९७,००० रूपयांवर आला आहे. दरम्यान, सध्याच्या काळ हा लग्नसराईचा असल्याने सोन्याच्या दरातील ही घसरण सामान्य वर्गाच्या पथ्थ्यावर पडणारी मानली जात आहे. आगामी काळात सोन्याचा भाव आणखी किती खालपर्यंत घसरणार, याची उत्सुकता आता सर्वांना लागू राहिली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment