जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२५ । गेल्या वर्षी २०२४ मध्ये मौल्यवान वस्तू सोन्यासह चांदी (Gold Silver) किमतीत ऐतिहासिक वाढ पाहायला मिळाली. यानंतर नवीन वर्षात तरी दिलासा मिळण्याची अपेक्षा ग्राहकांना असून मात्र या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सोन्याने मोठी झेप घेतली. त्यापाठोपाठ चांदीने पण महागाईची तुतारी फुंकली. आजच्या दिवशी देखील सोन्याचे भाव वाढले असून ग्राहकांच्या खिशाला मोठा चाप बसणार आहे.
Goodreturns वेबसाईटनुसार, बुधवारी म्हणजेच आज ९ जानेवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. २४ कॅरेट सोन्याच्या दरात ३८० रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. यामुळे आता २२ कॅरेट १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज ७२,७५० रुपये इतका आहे.तर २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव आज ७९,३५० रुपये इतका आहे. दुसरीकडे एक किलो चांदीचा भाव ९२,५०० रुपये इतका आहे.
दरम्यान, १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय बजेट सादर होत आहे. त्यानंतर लवकरच सोने ९० हजारी सलामी देईल. तर चांदी १ लाख १० हजारांच्या घरात पोहचेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे