---Advertisement---
जळगाव जिल्हा वाणिज्य

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सोन्याच्या किमतींनी गाठलं आभाळ ; जळगावात आजचे भाव पहा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मे २०२५ । पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) मधील तब्बल 9 दहशतवादी तळ उडविले. दुसरीकडे या कारवाईनंतर सोन्याच्या किमतींनी थेट आभाळ गाठलं. जळगावच्या सुवर्णपेठेत सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. यामुळे जीएसटीसह सोन्याचा तोळा पुन्हा एकदा लाखाच्या वर गेला आहे.

gold jpg webp webp

जळगावच्या सराफ बाजारात बुधवारी देखील सोने दरात वाढ झाली. सोन्याचा दर ५०० रुपयांनी वाढला. यामुळे जळगावात आता २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ९७७०० (१००६३१) रुपयावर पोहोचला आहे. तर चांदीचा दर ९८००० रुपयावर आहे.

---Advertisement---

दरम्यान या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने १८०० रुपयांनी वाढले होते. त्यानंतर मंगळवारी १४०० रुपयांनी तर बुधवारी ५०० रुपयांनी वाढले. यामुळे गेल्या तीन दिवसात जळगावात सोने दरात ३७०० रुपयांनी वाढले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment