---Advertisement---
बातम्या

Gold Rate : होळीच्या दिवशी सोन्याचा भाव वाढला ; आता १० ग्रॅम खरेदीसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२५ । सोने आणि चांदी दरातून ग्राहकांना काही दिलासा मिळताना दिसत नाहीय. दरम्यान, आज होळीचा सण असून, अनेक लोक शुभ मुहूर्त साधून सोनं खरेदी करतात. मात्र आजच्या दिवशी सोन्याचे दर वाढलेले आहेत.

gold silver jpg webp

किती रुपयांनी वाढला भाव?
सोन्याच्या भावाने पुन्हा एकदा विक्रमी पातळी गाठली आहे. तसेच तो ८८ हजार रुपयांच्या पातळीवर गेला आहे. Good returns वेबसाईटनुसार, गुरुवारी म्हणजेच आज 13 मार्च रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 600 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर आता २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर 81,350 एवढा आहे. तर २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 88,730 रुपये इतका आहे.

---Advertisement---

जळगावात सोने चांदीचा दर काय?
जळगावच्या सराफा बाजारात बुधवारी चांदीचा भाव १,००० रुपयांनी वाढून ९९,००० रुपये (जीएसटी शिवाय) प्रतिकिलो झाला. ३० ऑक्टोबर २०२४ रोजीच्या १,००,००० रुपयांच्या विक्रमी उच्चांकावरून आता ते फक्त १००० रुपये कमी आहे. दुसरीकडे सोन्याचा दर ८८६०० रुपये प्रति तोळा इतका आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment