जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२५ । अमेरिकी सरकारच्या टॅरीफच्या स्थगितीनंतर सोन्याच्या किमतीने नवीन इतिहास रचला आहे. जळगावच्या सुवर्णपेठेत चौथ्या दिवशी भाववाढ झालीय. यामुळे सोन्याचा दर विनाजीएसटी ९४ हजारांच्या जवळ पोहोचले आहे.

शनिवारी (१२ एप्रिल) सोने भावात ६०० रुपयांची वाढ होऊन, ते विनाजीएसटी ९३ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर तर जीएसटीसह ९६,६१४ रुपयावर पोहोचले. सोन्याचा हा आतापर्यंत सर्वच उच्चांक दर आहे. तसेच शनिवारी चांदीमध्ये थेट दोन हजार ३०० रुपयांची वाढ होऊन, ती विनाजीएसटी ९५ हजार ८०० रुपये प्रति किलोवर पोहोचली.
अमेरिकी सरकारच्या टॅरीफच्या स्थगितीनंतर सोने-चांदीचे भाव वाढू लागले आहेत. १० व ११ एप्रिल रोजी सलग दोन दिवस प्रत्येकी १९०० रुपयांची वाढ होऊन ९३ हजार २०० रुपयांवर पोहोचलेल्या सोने भावात १२ एप्रिल रोजी ६०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोने ९३ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले. ११ एप्रिल रोजी ९३ हजार ५०० रुपयांवर स्थिर असलेल्या चांदीच्या भावात १२ एप्रिल रोजी थेट दोन हजार ३०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी ९५ हजार ८०० रुपये प्रति किलोवर पोहोचली.