जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२४ । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यासह जळगाव जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी पोलिसांसह निवडणूक विभागाच्या भरारी पाठकडून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. याच दरम्यान पुण्याहून जळगावला येणारे ५ कोटी ५९ लाख रुपयांच्या सोने-चांदीच्या विटांसह दागिने घेऊन येणारे वाहन पोलिसांनी जप्त केले आहेत. यात शहरातील तीन ज्वेलर्स दुकानाचा हा ऐवज असून पोलिसांनी कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर ते कोषागारात रवाना केले.
शुक्रवारी रात्री ८ पथकांकडून वाजेच्या सुमारास जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या आर.एल. चौफुलीवर नाकाबंदी दरम्यान एमआयडीसी पोलिसांसह निवडणूक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. शहरातील बाफना, स्वस्तिक आणि निलांजली या ज्वेलर्सने पुण्यातून ५ कोटी ५९ लाख रूपयांचे सोने-चांदींच्या विटांसह दागिने मागवले होते.
हे संपूर्ण दागिने शुक्रवारी पुण्यातून स्वीक्वेल कंपनीच्या वाहनातून (एम.एच.१२.यू.एम.५६२०) जळगावात येते होते. शनिवारी देखील पुन्हा पंचनामा करत कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. यानंतर सायंकाळी संपूर्ण दागिने एका पेटीमध्ये सीलबंद करत कोषागारात पाठवण्यात आले. दरम्यान, ज्या वाहनातून दागिने आले, त्या चालकाकडे संपूर्ण कागदपत्र होती.