जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२१ । जळगाव शहरातील आकांक्षा म्हेत्रे हिने पुन्हा एकदा जळगावचे नाव उंचावले आहे. हरियाणा येथे सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने आयोजित राष्ट्रीय रोड रेस सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविल्यानंतर आकांक्षाने पुन्हा एकदा सुवर्ण गवसणी घातली आहे. नुकतेच जयपूर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत तिने सुवर्णपदक व रौप्य पदक पटकावले आहे.
नुकत्याच जयपुर, राजस्थान येथील सवाई मानसिंग स्टेडिअमवर झालेल्या ७३ व्या सिनियर, ५० व्या ज्युनियर आणि ३६ व्या सब ज्युनियर राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत खेळाडू आकांक्षा म्हेत्रे हिने चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक व रौप्यपदक मिळवले. आकांक्षाने युथ गर्ल्स गटातील ५०० मीटर टाईम ट्रायल प्रकारात ४२.४५२ सेकंदाची वेळ नोंदवताना सुवर्णपदक पटकावले. तसेच २ किलोमीटर वैयक्तिक परसुट प्रकारात ३ मिनिट ५.८३९ सेकंदाची वेळ नोंदवत रौप्यपदक मिळवले. आकांक्षाचे हे आतापर्यंत राष्ट्रीय स्पर्धेत पाचवे मेडल आहे.
राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी आकांक्षा ही जिल्ह्यातील पहिली खेळाडू ठरली आहे. तीच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे सर्वदूर कौतुक होत आहे. हरियाणा येथे २५ ते २८ नोव्हेंबर दरम्यान पार पडलेल्या सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने आयोजित २६ व्या राष्ट्रीय रोड रेस सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत देखील आकांक्षा म्हेत्रे हिने युथ मुलींच्या वयोगटात १५ कि.मी टिम टाईम ट्रायल या क्रिडा प्रकारात सुवर्ण पदक पटकविले होते.
हे देखील वाचा :
- सरकारी नोकर भरतीतील शिंदे-फडणवीस सरकारच्या गेमचेंजर पॉलिसीमुळे पात्र युवकांना संधी
- 10वी आणि 12वी परीक्षेच्या फीमध्ये वाढ; आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार?
- लाल किल्ल्यावरून मेडीकल शिक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा
- विनापरीक्षा नोकरीची मोठी संधी ; 3256 जागांवर निघाली भरती, पगारही भरघोष मिळेल..
- NEET पेपर फुटल्यानंतर देशभरात अँटी पेपर लीक कायदा लागू ; जाणून घ्या कायद्यातील तरतुदी?