जळगाव लाईव्ह न्यूज ।13 मार्च 2024 । जळगाव येथील गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या मेडिकल सर्जिकल नर्सिंग विभागातर्फे नुकतेच जर्मनीतील नर्सिंग करिअरसाठी मार्गदर्शनपर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग जळगाव येथे बेसिक बी एस्सी नर्सिंगच्या अंतिम वर्षाच्या बॅचसाठी या सेमीनारचे आयोजन करण्यात आले होते. एम डी फिजिशियन मास्को व डीसीएच पुण्याहून केलेले डॉ. ललीत पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थीत होते त्याच्यासोबत प्राचार्य विशाखा गणविर,विभागप्रमुख प्रा मनोरमा कश्यप इ उपस्थीत होते.
डॉ. ललीत पाटील यांनी मार्गदर्शन करतांना नर्सिगमध्ये अनेक संधी उपलब्ध असून विदयार्थ्यांनी माहिती संकलीत करून प्रयत्न केले पाहीजे. जर्मनीत नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असून यासाठी विविध मार्ग त्यांनी चित्रफितीव्दारे समजावून सांगितले. यात परिक्षा, मुलाखत तंत्र तसेच भाषा संवाद आणि प्रशिक्षणाच्या विविध पध्दतीची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य विशाखा गणविर आणि प्रा मनोरमा कश्यप यांनी तर आभार प्रा जॉय जाधव यांनी मानले. या सेमीनार मध्ये १००च्या वर विदयार्थ्यांनी तसेच प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला.यशस्वीतेसाठी प्रा किर्ती ढाले,प्रा स्नेहा चांदेकर, प्रा स्मीता पांडे, प्रा प्रणाली बुडे यांनी परिश्रम घेतले.