⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | गोदावरी आयएमआर महाविद्यालयात डॉ.एस.आर. रंगनाथन जयंती निमित्त अभिवादन

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात डॉ.एस.आर. रंगनाथन जयंती निमित्त अभिवादन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२४ । गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयात डॉ.एस.आर. रंगनाथन यांची जयंती ग्रंथालयात साजरी.

भारतातील ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ.एस.आर. रंगनाथन यांची जयंती ग्रंथालयात साजरी करण्यात आली.१२ ऑगस्ट हा दिवस भारतात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो. मान्यवरांच्या हस्ते डॉ . रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी ग्रंथालय आणि माहिती विज्ञान विभागाचे उपप्रमुख श्री. गणेश सरोदे यांनी रंगनाथन यांचा जीवन इतिहास कथन करताना सांगितले की, डॉ.रंगनाथन यांचा जन्म मद्रास प्रांतातील (सध्याचे चेन्नई) तंजावर जिल्ह्यातील शियाली या छोट्याशा गावात ९ ऑगस्ट १८ साली झाला. त्याचे प्राथमिक शिक्षण शियाली येथील हिंदू हायस्कूलमध्ये झाले. विद्यार्थीदशेपासून त्यांनी संस्कृत वाङ्मयाचे अध्ययन सुरु केले होते. नंतर मद्रास येथील ख्रिश्चन कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन इंग्रजी विषयात बी.ए.ची पदवी प्राप्त केली. याप्रसंगी महाविद्यालयामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.