गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक पारितोषिक समारंभ उत्साहात
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२४ । गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव मार्फत वर्षभरात घेण्यात आलेल्या स्पर्धामधील विजेत्यांचे कौतुक करण्यासाठी वार्षिक पारितोषीक समारंभ उत्साहात पार पडला.
स्पर्धांमध्ये भाग घेणार्या विदयार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वार्षिक शैक्षणिक पारितोषिक समारंभाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या वार्षिक शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेऊन त्यांना पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ .उल्हास पाटील, गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ.वर्षा पाटील होते. प्री प्रायमरी पासून ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांचे कौतुक व अभिनंदन केले गेले.
डॉ. उल्हास पाटील यांनी मुलांचे कौतुक करत मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी वार्षिक पारितोषीक वितरण समारंभ गरजेचे असते असे सांगत विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने अभ्यास आत्मसात कसा करावा,क्रिडा कौशल्य कसे प्राप्त करावे याबाबत टीप दील्यात.तर डॉ. वर्षा पाटील यांनी पालकांनी अभ्यासाबरोबर पाल्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न केले पाहीजे असे सांगीतले. तर प्राचार्य निलीमा चौधरी यांनी प्रास्ताविकात पाल्य आणि शिक्षक यांचे समन्वयातून भावी पिढी घडत असल्याचे समाधान व्यक्त केले.यावेळी विजेताप्राप्त विदयार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. स्कूलच्या प्राचार्य सौ नीलिमा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.