⁠ 
शनिवार, जून 22, 2024

भयंकर! उष्माघातामुळे कुऱ्हाकाकोडा येथे 100 पेक्षा जास्त शेळ्यांचा मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२४ । जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरू असून तापमान ४५ अंशावर जाऊन पोहोचले आहे. तीव्र उन्हामुळे माणसांच्या अंगाची लाही लाही होत असताना जनावरांनाही या तीव्र उष्णतेचा फटका बसत असताना दिसत आहे. याच दरम्यान मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हाकाकोडा येथे 100 पेक्षा जास्त शेळ्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. यामुळे मेंढपाळ यांचे मोठे नुकसान झाले आहे.

या घटनेनंतर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन मुख्यमंत्र्यांना नुकसान ग्रस्त मेंढपाळ कुटुंबीयांना मदतीचे आव्हान केले आहे. तसेच स्थानिक पशू चिकित्सक यांनी या मेंढ्यांचे शवविच्छेदन केले असून उष्माघातामुळे शेळ्या मरण पावल्याचे निदान केले आहे.

दरम्यान, यंदाचा उन्हाचा जळगावकरांना अक्षरशः हैराण करून सोडत आहे. गेल्या काही दिवसापासून जिल्ह्याचा पारा ४५ अंशावर गेल्याने या तापमान वाढीचा फटका सगळ्यांनाच बसताना दिसत आहे. नुकतेच वाढत्या उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी जिल्ह्यात जमाबंदीचे आदेश पारित केले आहे. उष्माघातापासून काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात आले आहे.