जिल्ह्यात मागील काही दिवसापासून पाऊस सुरु आहे. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. तर काही धरण फुल भरून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. काल रात्रीच गिरणा धरणात ९९ टक्के जलसाठा झाला होता. तर आज सकाळी धरण पूर्णपणे भरले असून यातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
#गिरणा धरण सलग तिस-या वर्षी 100% भरले. सध्या धरणाचे 4 दरवाजे उघडले. 7 हजार क्यूसेक्स वेगाने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू. पहा हे विहंगम दृश्य. #जळगाव @abpmajhatv @DDSahyadri @saamTVnews @TV9Marathi @zee24taasnews @JaiMaharashtraN @news_lokshahi @Jayant_R_Patil @JalgaonDM pic.twitter.com/bWsh9H0GF6
— DISTRICT INFORMATION OFFICE, JALGAON (@InfoJalgaon) September 30, 2021

दरम्यान, गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने खालील बाजूला असलेल्या गावांमध्ये प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. तसेच गुरांना नदीपात्रात उतारू नये असा इशारा प्रशासनाने दिला आहे. गिरणा धरण पूर्ण भरण्याची यंदा हॅटट्रीक झाली आहे. तर, धरण बांधल्यापासून ते फुल्ल भरल्याची यंदाची अकरावी वेळ आहे. अर्थात हे धरण पहिल्यांदाच लागोपाठ तिसर्या वर्षी पूर्ण भरले आहे. यामुळे यावर अवलंबून असणार्या नागरिकांसह शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.