जळगावच्या मुलींची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद ; केला ‘हा’ विश्वविक्रम..
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२३ । जळगाव शहरातील दोन मुलींनी सॉफ्ट टॉइज कॅच प्रकारात विश्वविक्रम केला असून, याची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये (Guinness Book of World Records) झाली आहे. यामुळे त्यांनी जळगावच्या नावलौकिकात भर टाकून शहराचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले आहे.
जळगाव येथील जीविका आनंद बंग (११ वर्षे) आणि प्रेक्षा योगेश लाठी (१५ वर्षे) या दोघींनी गेल्यावर्षी इंग्लंडचा जॅक डेन आणि राफा डेन यांनी प्रस्थापित केलेला विक्रम मोडून नवा विक्रम रचला आहे. या विक्रमात जीविकाच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती आणि तिने न बघता सॉफ्ट टॉइज क्याच (झेल) करावयाचे होते.
तिच्या दुसऱ्या बाजूला प्रेक्षा तिच्या दिशेने १० फूट अंतरावरून सॉफ्ट टॉइज फेकत होती. शेवटच्या प्रयत्नात जीविकाने एकूण २८ सॉफ्ट टॉइज पकडून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या पेक्षा ५ टॉइजचे कॅच जास्त घेतले.