---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांची फेसबुकवर बदनामी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२१ । फेसबुकवर बनावट खाते तयार करून त्यावरून आ. गिरीश महाजन यांच्या व्हिडिओवर आक्षेपार्ह व बदनामीकारक कमेंट करणाऱ्या अज्ञात इसमाविरूध्द जळगावच्या सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

girish mahajan video spam fake account jpg webp

 

---Advertisement---

अज्ञात इसमाने त्याची स्वत ची ओळख लपवून बनावट फेसबुक खाते तयार केले आहे. दि.११ नोव्हेंबर २०२१ रोजी या फेसबुक खात्यावरुन त्याने माजी मंत्री आमदार गिरीष महाजन सपोर्टर या नावाचे फेसबुक खात्यावरील आमदार गिरीश महाजन यांच्या व्हिडिओवर आक्षेपार्ह व बदनामीकारक कमेंट केली. याप्रकरणी तुषार पुरुषोत्तम चौधरी (वय २८) रा.प्रेमनगर जामनेर यांच्या तक्रारीवरुन अज्ञात इसमाविरोधात जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---