---Advertisement---
राजकारण जळगाव जिल्हा

जळगावातून लोकसभेसाठी उमेदवारी देण्याच्या चर्चेवर गिरीश महाजनांचे स्पष्टीकरण, म्हणाले..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२३ । आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आतापासूनच कंबर कसली असून या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या चाचपणी देखील सुरु आहे. दरम्यान, अलीकडेच भाजप आमदारांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविणार असल्याच्या चर्चा आहे. त्यात भाजपचे संकटमोचक अशी ओळख असणाऱ्या ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना जळगावातून लोकसभेसाठी उमेदवारी देण्याची चर्चा सुरु आहे. यावर आता गिरीश महाजन यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

girish mahajan jpg webp

काय म्हणाले महाजन?

---Advertisement---

“या सर्व खोट्या गोष्टी आहेत आहेत. मीही टीव्हीवरच बघतोय की माझं नाव खासदार म्हणून सुचवलं जातं आहे. असा कुठलाही विषय, चर्चा आणि निर्णय बैठकीत झालेला नाही, असं स्पष्टीकरण मंत्री गिरीश महाजन यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना दिल.

याचवेळी गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केलेल्या टीकेलाही उत्तर दिलं. “तुम्ही माझ्यामागे मोका लावून चांगलं काम केलं,” असं गिरीशी महाजन यांनी म्हटलं. “मी तर तुमच्यावर कुठलेही आरोप केलेले नाहीत, जे आरोप केले आहेत ते अंजली दमानिया यांनी केलेले आहेत म्हणूनच तुमची चौकशी झालेली आहे.

आपला जावई जवळपास दोन-तीन वर्षापासून जेलमध्ये आहे, त्यांना जामीन मिळत नाही. आपलं कुटुंबीय कोर्टाने थांबवलं म्हणून सध्या बाहेर आहेत, त्याची कल्पना तुम्हाला आहे. म्हणून तुम्ही माझ्यावर तो मोका लावला तो कसा लावला त्याची कल्पना मला आहे.असंही महाजन म्हणाले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---