---Advertisement---
जळगाव जिल्हा

… तर तुमच्या पायातला जोडा अन् आमचं डोकं ; असं का म्हणाले गिरीश महाजन?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२३ । जिल्हा दूध संघाची सर्वसाधारण सभा शनिवारी पार पडली. यावेळी बैठकीला उपस्थिती असलेले मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

girish mahajan 1 jpg webp

नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन?
जिल्हा दूध संघात आम्ही अगदी प्रामाणिकपणाने काम करू. हे करत असताना आम्ही तुमचे लाख रुपये, शंभर रुपयेच काय पण एक रुपया जरी खाल्ला तर तुमच्या पायातला जोडा आहे आणि आमचं डोकं आहे, असं गिरीश महाजन म्हणाले. आम्ही पारदर्शक कारभार करणारच असंही त्यांनी ठासून सांगितलं. यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांच्यावरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

---Advertisement---

यावेळी गिरीश महाजन यांनी जिल्हा दूध संघाची पुढची वाटचाल कशी असेल याबाबतचं मार्गदर्शनही केलं. जिल्हा दूध संघाच्या माध्यमातून शेतकऱ्याला पूरक व्यवसाय हा निर्माण व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांनाही सुगीचे दिवस यावे यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकष्ठा करणार आहोत.

आम्हाला कुठे गाडीच्या डिक्कित टाकून घरी बटर न्यायचं नाही. तूप भरून न्यायचे नाही. जिल्हा दूध संघाची गाडी वापरायची नाही. ड्रायव्हर वापरायचा नाही, अशा शब्दात गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर हल्ला चढवला. खडसेंच्या संचालक मंडळात झालेल्या गैर व्यव्यहरावर भाष्य करत आणि खडसे यांचं नाव न घेता महाजन यांनी टोलेबाजी केली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---