जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२२ । एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला होता. शिंदे यांना शिवसेनेच्या(Shivsena) जवळपास ४० आमदारांनी पाठींबा दिल्यामुळे उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर शिंदे गट आणि भाजपने एकत्र येत राज्यात नवीन सरकार स्थापन केलं आहे. मात्र भाजपकडून शिवसेना संपविण्याचे काम केलं जात असल्याचे शिवसेनेकडून म्हटलं जात आहे. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान, अशातच भाजप (BJP) नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. Girish Mahajan criticizes Uddhav Thackeray
आम्ही शिवसेना संपवण्याचं काम करत नाही. तुम्ही गेल्या निवडणुकीला आमच्या सोबत होते म्हणून तुमचे 55 आमदार निवडून आले. नाही तर 15 तरी आले असते का? तुम्ही अमित शाह आणि मोदींचा फोटो लावून मतं मागितले म्हणून तुमचे 15 खासदार निवडून आले. नाहीतर तुमचे दोन तरी खासदार निवडून आले असते का? हे तुम्ही तुमच्या छातीवर हात ठेवून सांगा असे म्हणत महाराजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
गेल्या निवडणुकीत आपण भाजप सेना युती म्हणून एकत्र लढलो होते. जनतेने स्पष्ट बहुमत देखील दिले होते. मात्र तुम्हाला दुर्बुद्धी सूचली, तुम्ही भाजपला सोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आणि तेव्हापासूनच तुमचे काऊंटडाऊन सुरू झाल्याचे महाजन यांनी म्हटले आहे.
तुम्ही सत्तेत आलात आणि खुर्चीची हवा तुमच्या डोक्यामध्ये गेली. कोणालाही तुम्हाला भेटण्यास वेळ नव्हता. तुम्ही स्वतः कोणतेही निर्णय घेतले नाही. दुसऱ्याच्या म्हणण्यावर तुम्ही चालले. दुसऱ्या नेत्याच्या म्हणण्यावर तुम्ही चाललात म्हणून ही वेळ तुमच्यावर आली, असेही महाजन म्हणाले..