---Advertisement---
जळगाव शहर राजकारण

एकनाथ खडसेंची अवस्था म्हणजे .. गिरीश महाजनांची घणाघात

girish mahajan eknath khadse
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२२ । भाजपसोडून राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे (Eknath Khadse) हे विधानपरिषदेचे आमदार झाले असून त्यांनी नुकतीच विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. दरम्यान, भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एकनाथ खडसेंची अवस्था म्हणजे मंदिराच्या बाहेर गेले अन् चप्पलच चोरीला गेली अशी झाली आहे, असं गिरीश महाजन म्हणाले आहेत. Girish Mahajan criticizes Eknath Khadse

girish mahajan eknath khadse

पंगत बसली आणि बुंदी संपली. सोशल मीडियावर ऐकलं त्याहीपेक्षा मी अस ऐकलं मंदिरात गेले आणि प्रसाद संपला. मंदिराच्या बाहेर आले तोवर चप्पलच चोरीला गेली,अशी अवस्था खडसेंची झाली आहे”, असं गिरीश महाजन म्हणालेत.“खरंतर खडसेंना असं वाटत होतं आपण मंत्री होऊ पण सर्व गोष्टी मनासारख्या होत नाहीत. खडसेंनी विधान परिषदेत शपथ घेतली. ते महाविकास आघाडीचा भाग झाले.

---Advertisement---

पण खडसे महाविकास आघाडीत आले आणि उद्धव ठाकरेंच्या हातून सत्ता गेली.त्यामुळे खडसेंना आता -आमदारकीवरच समाधान मानावे लागेल. एकनाथ खडसे यांनी नुकतंच विधान परिषदे शपथ घेतली. त्यांना माझ्या शुभेच्छा, असं महाजन म्हणालेत. असेही महाजन म्हणाले आहे. दरम्यान, आता यावर खडसे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे गरजेचे आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---