---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

..म्हणून एकनाथ खडसेंना पक्षाने हाकलून दिले ; मंत्री महाजनांचा हल्लाबोल

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ डिसेंबर २०२३ । भाजपचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कूत्ता यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल एसआयटी चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केली आहे. तसेच देवेंद्र फडणवीसांसह गिरीश महाजन यांच्यासारख्यांनी मला टार्गेटेड करुन बदनाम करण्याचा प्रयत्न केल्यामुळेच मला भाजपमधून (BJP)बाहेर पडावे लागलं,” अशी खंतही खडसे यांनी बोलून दाखवली. दरम्यान, यावर आता मंत्री गिरीश महाजन यांनी चोक प्रत्त्युत्तर दिल आहे.

eknath khadse girish mahajan jpg webp

काय म्हणाले गिरीश महाजन?
मंत्री महाजन म्हणाले की, एकनाथ खडसेंचा राजीनामा हा दाऊदचा आरोप झाला म्हणून घेतला नव्हता. तर पक्षात राहून त्यांनी चोऱ्या आणि आर्थिक घोटाळे केले होते, त्यामुळं त्यांना पक्षाने हाकलून दिले. आणि खडसे ज्या फोटोवरुन आरोप करत आहेत ते दहा वर्षांपूर्वीचे कुंभमेळा प्रसंगी मुस्लिम धर्मगुरुंच्या घरी असलेल्या विवाह सोहळ्यातील फोटो असल्याचे महाजन म्हणाले. सध्या एकनाथ खडसे हे आता मानसिक तणावात असल्याचे महाजन म्हणाले.

---Advertisement---

भोसरी भूखंड प्रकरण गौण खनिज उत्खनन प्रकरणात आलेल्या नोटीसमुळं एकनाथ खडसेंची परिस्थिती केविलवाणी झाली आहे. काय बोलावं हे आता एकनाथ खडसेंना कळत नाही. त्यामुळं वाटेल ते बेछूट आरोप ते करत आहेत. एकनाथ खडसे यांच्या आरोपाला आम्ही किंमत देत नसल्याचे महाजन म्हणाले.

10 वर्षांपूर्वी कुंभमेळा प्रसंगी मुस्लिम धर्मगुरु यांच्या विवाह सोहळ्यात सर्व आमदार खासदार सर्व प्रतिष्ठित लोक उपस्थित होते. त्या लग्नात काही लोक आक्षेपार्ह होते असे आरोप होत आहेत. मात्र त्याबाबत आम्हाला कल्पना नाही. त्या विवाह सोहळ्यात आम्ही सर्व उपस्थित होतो, हे आम्ही मान्य करतो. हे यापूर्वीही याविषयी चर्चा झालेली आहे. त्यामुळं हा नवीन विषय नाही. वैफल्यग्रस्त परिस्थिती झाल्यामुळे काहीतरी बोलायचं म्हणून अशा प्रकारे आरोप केले जात असल्याचे महाजन म्हणाले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---