लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ! खात्यात खटाखट 3000 येणार, मंत्री गिरीश महाजनांची घोषणा..

जानेवारी 9, 2026 10:26 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२६ । राज्य सरकारची महत्वाकांक्षी असलेली लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहे. काही दिवसापूर्वीच नोव्हेंबर २०२५ महिन्याच्या हप्त्याचे १५०० रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते.

ladki bahin girish mahajan

यांनतर डिसेंबर आणि जानेवारी हप्त्याचे एकत्र ३००० रुपये जमा होणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. अखेर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पुढच्या ४ दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यात ३००० रुपये येणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजनांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर ट्विट करत दिली आहे.

Advertisements

लाडकी बहीण योजनेत याआधीच नोव्हेंबर- डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार होता. परंतु तेव्हा फक्त १५०० रुपये जमा झाले. त्यानंतर महिलांच्या मनात निराशा होती. त्यानंतर आता मात्र महिलांच्या खात्यात ३००० रुपये येणार आहेत.

Advertisements

मंत्री गिरीश महाजनांची माहिती
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे येणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजनांनी दिली आहे. त्यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर ट्विट करत माहिती दिली आहे.त्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यामध्ये देवाभाऊंकडून लाडक्या बहिणींना मिळणार.. मकर संक्रांतीची मोठी भेट !१४ जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात डिसेंबर व जानेवारी महिन्याचे ३००० रुपये जमा होणार !, असं म्हटलं आहे. याचसोबत एक पोस्टरदेखील शेअर केले आहे. ज्यामध्ये देवाभाऊंकडून लाडक्या बहि‍णींना मकर संक्रांतीची मोठी भेट, अशा आशयाची माहिती आहे. त्यामुळे लाडक्या बहि‍णींना दिलासा मिळणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now