जळगाव जिल्हा

प्रवाशांना दिलासा! जळगाव, भुसावळ मार्गे धावणाऱ्या या एक्स्प्रेसचे जनरल डबे वाढणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ जानेवारी २०२५ । देशात दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या करोडोच्या घरात आहे. प्रत्येक रेल्वे गाडीला जनरल डब्बे असतात. परंतु अनेक वेळा रेल्वेचा जनरल डब्बा इतका भरलेला असतो की त्यात पाय ठेवायलाही जागा नसते. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास होतो. यातच अलीकडे रेल्वेनं जनरल डब्बे वाढविण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार आता जळगाव आणि भुसावळ मार्गे धावणाऱ्या दोन एक्स्प्रेसचे जनरल डब्बे वाढविण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता दक्षिण-मध्य रेल्वेने विभागातील नऊ रेल्वे गाड्यांच्या डब्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांत या नऊ रेल्वे गाड्यांना दोन अतिरिक्त सामान्य डबे जोडले जाणार आहेत. यातील दोन रेल्वे या जळगाव, भुसावळमार्गे धावणाऱ्या आहेत.

रेल्वे क्रमांक १२७१५ आणि १२७१६ नांदेड-अमृतसर-नांदेड, २२७३७ आणि २२७३८ सिकंदराबाद-हिसार- सिकंदराबात या जळगाव, भुसावळ मार्गे धावणाऱ्या गाड्या आहेत. या गाड्यांना प्रवाशांची गर्दी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button