गायत्री भांगळेंनी स्वीकारला भुसावळच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार

डिसेंबर 24, 2025 11:01 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा पराभव करत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गायत्री भंगाळे यांनी भुसावळ नगराध्यक्ष पदी विजय मिळविला होता, नंतर गायत्री भंगाळे यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला आहे. भुसावळ शहराच्या विकासा साठी आपण सगळ्यांना सोबत घेऊन काम करणार असल्याच,त्यांनी म्हटलं आहे

gayatri bhangale

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी पुष्पगुच्छ देऊन नगराध्यक्षांचे स्वागत केले आणि अधिकृत प्रक्रिया पार पाडली. पदभार स्वीकारताना नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्यासोबत माजी आमदार संतोष चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नगरसेवक उल्हास पगारे यांच्यासह विद्यमान व माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements

पदभार स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया देताना नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी भुसावळ शहरातील रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यावर भर दिला. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, ड्रेनेज आणि मूलभूत नागरी सुविधा या मुद्द्यांवर प्राधान्याने काम करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

Advertisements

तसेच नगरपरिषदेच्या विविध विभागांची कार्यपद्धती अधिकाऱ्यांकडून समजून घेतली. शहराच्या प्रशासनात पारदर्शकता आणि गतिमान निर्णयप्रक्रिया राबवण्यावर भर दिला जाईल, असे संकेत त्यांनी दिले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now