⁠ 
सोमवार, जुलै 22, 2024

नवरात्रीपूर्वी सरकारची मोठी भेट ; घरगुती गॅसचे दर पुन्हा झाले कमी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२३ । मागील गेल्या काही महिन्यापासून गॅस सिलिंडरचे ११०० रुपयांवर भिडले होते. यामुळे सर्वसामान्य होरपळून निघत होता. यातच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून जनतेला दिलासा देण्याचे प्रयत्न केले जात आहे. सरकारने २९ ऑगस्ट २०२३ ला महत्त्वाची घोषणा करत घरगुती गॅस सिलेंडरचे (Gas Cylinder) दर २०० रुपयांनी कमी केले होते.अशातच आता उज्वला योजनेतील कोट्यावधी नागरिकांना मोदी सरकारने मोठा दिलासा दिला आहे

केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून यावेळी गॅस सिलेंडरच्या सबसिडीत पुन्हा वाढ करण्याचा निर्णय घेतला. या घोषणेमुळे उज्वला योजनेतील १० कोटी ग्राहकांना मोठा फायदा होणार असून आता उज्वला योजनेंतर्गत असलेल्या नागरिकांना आता फक्त ६०० रूपयांना गॅस सिलेंडर मिळणार आहे.

बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, उज्वला योजनेंतर्गत ३०० रूपये गॅस सबसिडी मिळणार आहे. त्यामुळे आता सिलेंडर आता ६०० रूपयांना मिळणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.