जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२४ । जळगाव शहरातील एमआयडीसीमधील केमिकल फॅक्ट्रीत स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली असताना दुसरीकडे जामनेर तालुक्यातील फत्तेपूरपासून जवळ असलेल्या पिंपळगावपिंप्री गावात घरात असलेल्या गॅस सिलेंडरमध्ये गळती होऊन सिलेंडरचा स्फोट झाला. यामुळे झोपडीला आग लागली. यात सहा घरे जळून खाक झाले आहेत. आज जळगाव जिल्ह्यात आगीच्या दोन घटना घडल्या आहेत.
जळगावातील एमआयडीसीमधील केमिकल फॅक्ट्रीत स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत१७ ते १८ कामगार यात गंभीररीत्या भाजले गेले आहेत. अग्निशमन बंबाच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यास ३ ते ४ तासांचा कालावधी लागला. कंपनीतील ही आग शमत नाही; तोच जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे सिलेंडरचा स्फोट होऊन झोपडीला आग लागल्याची घटना घडली.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील फत्तेपुरजवळील पिंपळगावपिंप्री गावात गॅस गळतीमुळे दुपारच्या सुमारास आग लागली. या आगीत सहा घरे जाळून खाक झाली आहेत. ही आग इतकी भयंकर होती कि, आजूबाजूच्या घरांनाही याचा फटका बसला आहे. या आगीमध्ये घरातील सर्व धान्य, टीव्ही, फ्रिज यासह घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत. यामध्ये काही मोटरसायकलींचे देखील नुकसान झाले असून या आगीच्या घटनेत १६ बकऱ्या देखील; जळाल्या आहेत.