खुशखबर.. दिवाळीपूर्वी स्वस्त होणार गॅस सिलिंडर, सरकारने केला ‘हा’ प्लॅन?
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२२ । मागील काही महिन्यात गॅस सिलिंडरचे भाव प्रचंड वाढले आहे. सध्याच्या घडीला घरगुती गॅस सिलिंडरचा दर एक हजार रुपयावर गेला आहे. यामुळे सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडून गेले आहे. अशातच केंद्र सरकारकडून गॅस दरवाढीतून दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सिलिंडरच्या किमती कमी करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
सरकारी तेल कंपन्या दर जारी करतात
गॅसचे वितरण इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड करते आणि गेल्या 2 वर्षांपासून सातत्याने किमती वाढल्यानंतर या कंपन्या तोटा सहन करून गॅसचे वितरण करत आहेत.
महागड्या एलपीजीपासून दिलासा
पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारी तेल कंपन्यांना 22 हजार कोटी रुपयांचे एकरकमी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या कंपन्यांचे नुकसानही भरून निघणार असून, सर्वसामान्यांनाही महागड्या एलपीजीपासून दिलासा मिळणार आहे.
2 वर्षात 459 ची वाढ
अनुराग ठाकूर म्हणाले की, कंपन्यांवरील आर्थिक दबाव कमी करण्यासाठी आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑक्टोबर 2020 पासून आत्तापर्यंत म्हणजे गेल्या 2 वर्षात गॅसच्या किमतीत 459 रुपयांनी वाढ झाली आहे.
आजचे दर तपासा
1 ऑक्टोबर 2020 रोजी देशाची राजधानी दिल्लीत 14.2 किलो गॅस सिलिंडरची किंमत 594 रुपये होती. याशिवाय कोलकात्यात 620.50 रुपये, चेन्नईमध्ये 610 रुपये आणि मुंबईत 594 रुपये होते. त्याच वेळी, जर आपण आजच्या किमतींबद्दल बोललो तर ते दिल्लीमध्ये 1053 रुपये, कोलकातामध्ये 1079 रुपये, मुंबईमध्ये 1052.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 168.50 रुपये आहे.