जळगाव लाईव्ह न्यूज : 1 मार्च 2024 : आजपासून मार्च महिना सुरू झाला असून महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 मार्च रोजी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. एकीकडे या महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. अशात गॅस सिलिंडरच्या किमतीत दिलासा मिळेल अशी अपेक्षा सर्वसामान्य करीत होता मात्र आज गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे.
१ मार्च २०२४ पासून सिलिंडर महाग झाला आहे. मात्र, तेल विपणन कंपन्यांनी पुन्हा एकदा व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत. दिल्लीत 25 रुपयांनी तर मुंबईत 26 रुपयांनी महागले आहे.घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती स्थिर आहेत. नवीन दर जाणून घ्या..
१९ किलोच्या सिलिंडरचे नवे दर
तेल विपणन कंपन्यांनी सलग दुसऱ्या महिन्यात १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करून महागाईला धक्का दिला आहे. गेल्या महिन्यात अर्थसंकल्पाच्या दिवशी म्हणजे 1 फेब्रुवारी 2024 रोजी त्यात 14 रुपयांनी वाढ केल्यानंतर आता सिलिंडरची किंमत एकदा 25 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. बदललेले दर IOCL च्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत, जे आजपासून म्हणजेच 1 मार्च 2024 पासून लागू आहेत.
नवीन दरानुसार, राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर 1795 रुपयांना मिळणार आहे, तर कोलकातामध्ये हा सिलेंडर आता 1911 रुपयांचा झाला आहे. मुंबईत व्यावसायिक सिलिंडरचा दर 1749 रुपयांवर, तर चेन्नईमध्ये 1960.50 रुपयांपर्यंत वाढला आहे.
दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती मात्र स्थिर आहेत. 14.2 किलो LPG सिलेंडरची किंमत दिल्लीत 903 रुपये, कोलकात्यात 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 918.50 रुपये आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती दीर्घकाळापासून स्थिर आहेत.