⁠ 
शनिवार, मे 4, 2024

सर्वसामान्यांसाठी खुशखबर! गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची कपात

जळगाव लाईव्ह न्यूज | 7 मार्च 2024 | आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्रातील भाजप सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा देणारे निर्णय घेतले जात असून अशातच सरकारने किचन बजेटमध्ये थोडा दिलासा दिला.

सरकारने जागतिक महिला दिनी, मोदी सरकारने गॅस सिलेंडरच्या दरात 100 रुपयांची कपात केली. यामुळे आता घरगुती गॅस सिलेंडरचा दर 802.50 रुपयांवर आला आहे.

यापूर्वी ऑगस्ट 2023 मध्ये 200 रुपयांची कपात करण्यात आली होती. गॅस सिलेंडरच्या किंमती एकूण 300 रुपयांनी कमी झाल्या आहेत. जून 2023 मध्ये गॅस सिलेंडर 1100 रुपयांवर पोहचल्या होत्या. गेल्या सात महिन्यांपासून 14.2 किलोच्या सिलेंडरचा भाव 902.50 रुपये होता. आता त्यात 100 रुपयाची घसरण झाल्याने सर्वसामान्यांना दिलास मिळाला आहे.